Home मुंबई आसाम आणि बिहार राज्यात पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्यांसाठी मदतीचा हात मॅनकाइंड फार्मा कंपनीची...

आसाम आणि बिहार राज्यात पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्यांसाठी मदतीचा हात मॅनकाइंड फार्मा कंपनीची पूरग्रस्तांना 2 कोटींची मदत

169

बाळू राऊत प्रतिनिधी
घाटकोपर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात परिस्थिती चिंताजनक असताना आसाम आणि बिहार या दोन राज्यांमध्ये पावसात पूरस्थिती निर्माण झाल्याने घरे , शेतजमीन , शाळा , पूल आणि रस्त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पूरग्रस्तांना मदत म्हणून देशातील अग्रेसर असलेल्या मॅनकाइंड फार्मा कंपनीने 2 कोटी रुपयांची मदत केली आहे. या निधीतून पूरग्रस्तांना औषधें व अन्न वाटप केले जाणार असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जुनेजा म्हणाले. मॅनकाइंड फार्मा कंपनीने देशात वेळोवेळी संकटकाळात मदतीचा हात पुढे केला आहे. कोव्हीड 19 विरुद्धही आम्ही या लढाईत उतरून देशातील अनेक राज्य सरकारला आर्थिक मदत केली आहे. या वैतिरिक्त व्हेंटिलेटर , संरक्षणात्मक उपकरणे आणि औषधें देखील दिले आहे. तसेच पंतप्रधान मदत निधी आणि मुख्यमंत्री मदत निधीला 51 कोटी रुपयांची देणगी व कोव्हीड युद्धात शहिद झालेल्या पोलिसांना 5 कोटी रुपयांची देणगी दिल्याचे राजीव जुनेजा यांनी माहिती देताना सांगितले.

Previous articleआधार फौंडेशन पिरळ मार्फत वृक्षारोपन . माजी सभापती दिलीप कांबळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य .
Next articleधानोरा फाटा येथील शाहा कोल कंपनीतील वाहन चालकाचा झोपेतच मृत्यु