पोलीस जवानांवर नक्षल्यांचा हल्ला, एक जवान शहीद, दुसरा जखमी भामरागड तालुक्यातील कोठी येथील घटना

636

 

संपादक जगदिश वेन्नम/सतीश कडारला

गडचिरोली : पोलीस उपविभागीय भामरागड अंतर्गत येथ असलेल्या कोठी पोलीस मदत केंद्रातील पोलिस जवानांवर नक्षल्यांनी हल्ला केला असून या हल्ल्यात एक पोलीस जवान शहीद झाला आहे तर दुसरा जवान जखमी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
पोलीस शिपाई दुशांत नंदेश्वर असे शहीद जवानाचे नाव असून पोलीस शिपाई दिनेश भोसले नामक जवान जखमी झाल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार दोन्ही जवान कोठी गावात किराणा सामान आणण्यासाठी गेले होते. दरम्यान नक्षल्यांनी दोन्ही जवानांवर हल्ला केला. यामध्ये पो. शी.दुशांत नंदेश्वर हे शहीद झाले आहेत. अधिक माहितीचा वृत्त लवकरच प्रसिध्द करण्यात येईल.