बिग ब्रेकिंग सुपरस्टार अभिनेता सलमान खानला सापाने केला दंश

 

हर्ष साखरे उपसंपादक

रायगड :-रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील वाझे येथील सलमान खान याच्या फार्म हाऊस येथे अभिनेता सलमान खानला सर्पदंश झाल्याची घटना असून कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात सलमान खानवर उपचार करून त्याला सोडण्यात आले आहे.

सुप्रसिध्द अभिनेता सलमान खान दरवर्षीप्रमाणे वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊस मध्ये आला असताना शनिवारी दिनांक २५ डिसेंबर रोजी रात्रीच्या वेळी सलमान खानला सर्पदंश झाला. यावेळी तात्काळ कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार्थ दाखल होऊन तसेच डॉक्टरांकडून उपचार करून सोडण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.

पनवेल तालुक्यातील नेरे गावच्या जवळ वाजे हे गाव असून या ठिकाणी सिनेअभिनेता सलमान खान यांचा अर्पिता नावाचा फार्म हाऊस आहे . निसर्गाचे सानिध्य त्याचबरोबर थंड आणि अतिशय निरामय ठिकाण असलेल्या या ठिकाणी खान कुटुंबिय सुट्टी त्याचबरोबर सेलिब्रेशन – साजरा करण्यासाठी येतात. हा फार्म हाऊस म्हणजे त्याचे आवडीचे ठिकाण असल्याने सलमान आपला वाढदिवस येथेच साजरा करीत आहेत. दरवर्षीप्रमाणे सलमान खान पनवेलच्या फार्म हाऊमध्ये आला असताना शनिवारी मध्यरात्री अचानकपणे सर्पदंश झाला.

यावेळी उपचाराकरिता कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार्थ दाखल झाले असून डॉक्टरांकडून प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले आहे. त्याचबरोबर दोन खाजगी डॉक्टरांच्या निगराणीखाली असल्याची अधिकृत माहिती मिळत आहे.