Home वाशीम मंगरुळपीर तालुक्यात रोडच्या संथगतीने चाललेल्या कामाचा वाहनधारकांना ञास,अपघाताची शक्यता

मंगरुळपीर तालुक्यात रोडच्या संथगतीने चाललेल्या कामाचा वाहनधारकांना ञास,अपघाताची शक्यता

148

 

फुलचंद भगत
मंगरुळपीर-वाशिम जिल्ह्यात हायवेचे कामे सुरु आहेत.कुठे हे रोडचे काम संपुन किरकोळ कामे बाकी आहेत परंतु मंगरुळपीर मानोरा रोडचे काम तर कासवगतीने सुरु असल्याने याचा नाहक ञास वाहनधारकांना होत असुन चिखलावरुन गाड्या घसरत असल्याने मोठा अपघात होन्याची शक्यता नाकारता येत नसल्याल्याने सबंधित ठेकेदारांनी प्रशासनाने लक्ष द्यावी अशी मागणी होत आहे.
प्रधानमंञी योजनेमधुन सिमेंट रोडचे काम सुरु असल्याने शहरांना जोडणारे या रोडमुळे आता जान्याचे अंतर कमी होणार आहे.परंतु मंगरुळपीर मानोरा रोडचे काम साखरडोह नजीक संथगतीने सुरु असल्याने वाहनधारकांसाठी बाजुला पर्यायी रस्ता केला आहे.परंतु या रस्त्यावर पावसाच्या पान्याने चिखल झाल्याने त्यावरुन वाहने घसरत असुन किरकोळ अपघातही झाले आहेत.याआधीच मंगरुळपीर मानोरा रोडच्या कामामुळे काहींना अपघातांमध्ये जीवही गमवावा लागला असल्याने सबंधित ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे पावसाळा सुरु असुनही कामे पुर्ण झाली नाहीत.वाशिम जिल्ह्यात तिनचार दिवसापासुन पाऊस सुरु असल्याने त्या मार्गावर पाणी साचत असल्याने चिखलही झाला आहे.या चिखलामधुन वाहणे घसरत आहेत.या रस्त्यावर अपघात होवुन कुणी जबाबदार कोण? असा प्रश्न पडत असल्याने त्वरीत कामे पुर्ण करुन वाहतुकीला रोड सुरु करुन द्यावा अशी मागणी होत आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206
9763007835

Previous articleशिष्टमंडळाने न.प.मुख्याधिकारी यांना दिले निवेदन
Next articleपोलीस जवानांवर नक्षल्यांचा हल्ला, एक जवान शहीद, दुसरा जखमी भामरागड तालुक्यातील कोठी येथील घटना