शिष्टमंडळाने न.प.मुख्याधिकारी यांना दिले निवेदन

214

 

तालुका प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

साकोली-सामाजीक कार्यकर्ते श्री.चंद्रकातजी वडीचार यांच्या नेतृत्त्वात शिष्टमंडळाने नगराध्यक्ष धनवंता राऊत व नगरपरिषद मुख्याधिकारी माधुरी मडावी यांना 23 लोकांच्या हस्ताक्षराचे निवेदन दिले.या निवेदनात साकोली शहरातील जुना बस स्टाप ते शारदा चौकापर्यंत सरळ रस्ता तयार करण्याचे नमूद केले आहे.
भारतीय स्टेट बँक ते शारदा चौकापर्यंत येणारा रस्ता हा ओशो व्हिडिओ जवळुन वळन घेऊन येत असल्याने तिथं नेहमी अपघात होत असतात.तसेच या रस्त्याच्या कडेला देशी दारूचे दुकान असल्याने स्थानिक महिलांना येण्या-जाण्यास खूप अडचणी येतात.त्यामुळे जुन्या बस स्थानकाची आवार भिंत तोडून शारदा चौकापर्यंत सरळ रस्ता मोकळा केल्यास महिलांना व नागरिकांना येण्या-जाण्यास सोईस्कर होईल असेही या निवेदनात नमूद केले आहे.
याआधी नागरिकांच्या आग्रहास्तव नगरसेवक सुभाष बागडे यांनी हा विषय नगरपरिषद मध्ये सभेत मांडला व तो सम्मत करून घेतला.यावेळी निवेदन देतानी नगरसेवक सुभाष बागडे, चंद्रकांत वडीचार,फईम शेख, मुकेश हटवार, हेमंत संग्रामे, खुशाल कापगते,शोयेब शेख,प्रमोद गजभिये व कार्यकर्ते उपस्थित होते.