केंद्र सरकार,रेल्वे आणि राज्य सरकार कोकण वासीयांना मूर्ख समजत आहे का? गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा संघटनेचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांचा सवाल

115

 

प्रतिनिधी / गौरव मुळ्ये.

रत्नागिरी:- गणेशोत्सवला फक्त 9 दिवस बाकी असताना केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणारी मध्य रेल्वे कोकणात गणेशोत्सवला जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे सुरू करण्यास परवानगी देण्यास तयार असल्याचे पत्रक काढून सांगत आहे तर राज्य सरकार देखील यावर विचार करत असल्याची माहिती आहे,गणपतीला 9 दिवस बाकी असताना आणि 12 तारखे नंतर कोरोना चाचणी बंधनकारक असताना कोकणात जाणार कोण ?आणि कसे?असा सवाल करत गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा यासंघटनेचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी केंद्र आणि राज्य सरकार कोकणवासीयांच्या भावनांशी खेळ खेळत आहे असा आरोप केला आहे.
कोकण वासीयांच्या मतांवर डोळा ठेऊन केवळ कोकणवासीयांची नाराजी नको म्हणून आम्हीच कसे कोकणातील नागरिकांच्या मदतीला धावून आलो हे दाखविण्याचा हा प्रयत्न नाही ना?असा प्रश्न देखील खंडागळे यांनी उपस्थित केला आहे.जर ट्रेन सोडायच्याच होत्या तशी मानसिकता रेल्वे, केंद्र आणि राज्य सरकारची होती तर आता पर्यंत कोणत्या मुहूर्ताची वाट पाहिली जात होती. केंद्र,रेल्वे आणि राज्य सरकार कोकणवासीयांना मूर्ख समजत आहे का?असा संतप्त सवाल सुहास खंडागळे यांनी केला असून ट्रेन सोडायच्याच होत्या तर याचे नियोजन 1 ऑगस्ट पूर्वी का नाही केले?आता ट्रेन सोडल्या तर येणाऱ्या चाकरमान्यांना कोरन्टीनचे नियम काय असणार आहेत?जर कोरोना चाचणी करून कोकणात यायचे असेल तर त्याचे नियम काय असतील?याबाबत काय योजना रेल्वे आणि सरकारने तयार केली आहे? की केवळ कोकणातील नागरिकांच्या भावनांशी खेळण्यासाठी अशा पध्दतीने हे विषय हाताळले जात आहेत असा सवाल खंडागळे यांनी उपस्थित केला आहे.केंद्र सरकार, रेल्वे आणि राज्य सरकार यांची कोकणातील चाकरमान्यां प्रती तसेच येथील गणेश भक्तांप्रति भावना प्रामाणिक असती तर कोकणातील गणेश भक्तांसाठीचे नियोजन एक महिन्या पूर्वीच झाले असते असेही खंडागळे यांनी म्हटले असून केंद्रातील सत्तेतील लोकं आणि राज्यातील सत्तेतील लोक फक्त कोकणवासीयांची नाराजी नको म्हणून शेवटच्या टप्प्यात ट्रेन सोडण्याबाबत पत्रक बाजी करणार असतील तर त्याचा आम्ही समस्त कोकणवासीयांकडून निषेध करतो असेही खंडागळे यांनी म्हटले आहे.

दखल न्यूज भारत