क्राईम वार्ता घरात घुसून महिलेस शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकीदुचाकीची धडक देऊन जखमी केले

222

घरात घुसून महिलेस शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी
दर्यापूर(उपजिल्हा प्रतिनिधी,युवराज डोंगरे)
घराचा दरवाजा तोडत असलेल्या युवकांना हटकल्याच्या कारणावरून महिलेच्या घरात घुसून शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या साखरी येथे घडली
रतन साहेबराव सिरसाट व अच्युत सिरसाट हे दोघेही फिर्यादी महिलेच्या काकाने विकत घेतलेल्या घराचा दरवाजा तोडत होते त्याबाबत त्यांना हटकले असता दोन्ही आरोपींनी फिर्यादी महिलेच्या घरात घुसून शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली तसेच घरातील गहू, दाळ व इतर साहित्य असा एकूण अंदाजे 1800 रुपयाच्या सामानाचे नुकसान केले याप्रकरणी खल्लार पोलिस स्टेशनमध्ये दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे
—————————————-
दुचाकीची धडक देऊन जखमी केले
दुसऱ्या घटनेत भरधाव वेगाने दुचाकी चालवून दुसऱ्या दुचाकीस्वारास धडक देऊन जखमी केल्याची घटना खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील कसबेगव्हान चिंचोली शिंगणे मार्गावरील पुलाजवळ घडली
फिर्यादी गोपाल रामदास भोंडे रा बेंबळा खुर्द आपल्या युनिकॉर्न दुचाकीने अंजनगावकडे जात असताना हरीचंद्र महादेव पळसपगार रा अकोट याने भरधाव वेगाने दुचाकी चालवून गोपाल भोंडेच्या दुचाकीला जबर धडक दिली या धडकेत डोक्याला मार लागला असुन दुचाकीचेही नुकसान झाले आहे सदर घटनेची तक्रार खल्लार पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आली असून खल्लार पोलिसांनी हरीचंद्र पळसपगार विरुध्द गुन्हा दाखल केला आहे