दर्यापूर नगर परिषदमधिल कर्मचारी 17 ऑगस्टला संपावर

190

दर्यापूर(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग कर्मचारी संघटना व संघर्ष समिती यांच्यावतीने घोषित केल्यानुसार दर्यापूर नगर परिषदमधिल कर्मचारी दि 17 ऑगस्टला एकदिवसीय संपात सहभागी होणार असल्याबाबतचे निवेदन नगर परिषदेच्या मुख्याधिकारी गिता वंजारी यांना देण्यात आले
नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीस तसेच कायदा व सुव्यवस्थेची सर्वस्वी जबाबदारी हि नगर परिषदेवर राहील असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे