Home चंद्रपूर  अघोषित डम्पिंग यार्ड ताबड़तोड़ बंद करा:- देवेंद्र बेले विदर्भ किसान मजदूर काँग्रेस...

अघोषित डम्पिंग यार्ड ताबड़तोड़ बंद करा:- देवेंद्र बेले विदर्भ किसान मजदूर काँग्रेस तर्फे आंदोलनाचा इशारा शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक देवेंद्र बेले

152

 

शंकर महाकाली
दख़ल न्यूज़ भारत
पोर्टेल न्यूज़ व यूट्यूब चैनल
चंद्रपुर/बल्लारपुर तालुका प्रतिनिधि
📲 8855043420

चंद्रपूर :- संपूर्ण देश कोरोनाचा संकटावर मात करण्यासाठी लढत असतांना तसेच चंद्रपूर शहरात वाढते कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असताना नागरिकां मध्ये आरोग्या विषय चिंता व कोरोना महामारीची भिती अधिक वाढली आहे.त्यातच चंद्रपूर शहरात महानगरपालिकेचे जटपुरा गेट परिसरात सराय इमारती जवळ कचरा डम्पिंग यार्ड आहेत. वास्तविक या परिसरात ऐतिहासिक गोंडकालीन जटपुरा गेट किल्ला आहे. दाट लोकांची वस्ती, मोठे दवाखाने, मेडिकल, रेस्टॉरंट, व्यापारी मार्केट संकुल, जिल्हा परिषद, पेट्रोल पंप,रहदारीच्या रस्ता असल्याने तसेच आज हा परिसर चंद्रपूर शहराचा मध्य भाग झाला आहे. रोज हजारो नागरिक या परिसरातुन प्रवास वाहतूक करीत असतात. आणि अश्या महत्वाच्या ठिकाणी मनपा ने डम्पिंग यार्ड (कचरा संकलन केंद्र) तयार करणे हे बरोबर नाही. या डम्पिंग यार्ड मध्ये जवळपास 90 ते 100 डुकरे रोज चिखलात लोळत असतात,मोकाट कुत्रे व इतर जनावरे सुद्धा खूप मोठया प्रमाणात असतात. या डम्पिंग यार्ड मध्ये सडलेल्या कचरा मध्ये प्लास्टिक असल्याने गाई व म्हशीं ते प्लास्टिक खातात.त्यामुळे ती जनावरे मृत्यूमुखी पडतात. सडका कचरा त्यात मृत्यूमुखी पडलेले जनावरे यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यातच पावसाचे दिवस आहे.अशा परिस्थिती मध्ये येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे, कधी पण शहराच्या मध्यभागी डम्पिंग यार्ड नसतो परंतु चंद्रपूर महानगरपालिकेने शहराच्या मध्यभागी अघोषित डम्पिंग यार्ड तयार केले आहेत. वायु प्रदूषण व जलप्रदूषण रोखण्याची आपल्या विभागाची जबाबदारी असल्यामुळे तसेच कोरोनाची सुरू असलेली महामारी व घाणीमुळे डेंग्यू, मलेरिया होण्याची दाट शक्यता आहे.
तरी आपणास विनंती आहे की, आपण स्वतः या बाबीकडे लक्ष देऊन हे अघोषित डम्पिंग यार्ड ताबडतोब बंद करावे. अन्यथा आपल्या कार्यालया समोर आंदोलन करण्यात येईल. व या परिसरातील नागरिकांचे आरोग्य खराब झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहणार

Previous articleडास प्रतिबंधक फवारणी करून मच्छरदानी उपलब्ध करून द्यावे
Next articleदर्यापूर नगर परिषदमधिल कर्मचारी 17 ऑगस्टला संपावर