डास प्रतिबंधक फवारणी करून मच्छरदानी उपलब्ध करून द्यावे

123

 

अश्विन बोदेले
ग्रामीण प्रतिनिधी
दखल न्यूज भारत

वडधा:- आरमोरी तालुक्याच्या वडधा परिसरात डासांचे प्रमाण खूप वाढलेले आहे . पावसाळ्यात साथीच्या आजारांची लागण होऊ नये यासाठी या भागात प्रशासनाने डास प्रतिबंधक फवारणी करून नागरिकांना मच्छरदानी चे वाटप करावे. अशी मागणी वडधा परिसरातील नागरिकांनी केलेली आहे. डासांचे प्रमाण वाढल्यामुळे डेंग्यू, मलेरिया, यासारखे आजार बळावन्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोग्य विभाग व प्रशासनाने साथीच्या रोगांना आळा घालण्यासाठी वेळीच वेळेचे व परिसरातील वातावरण याचे भान ठेवून या संपूर्ण भागात डास प्रतिबंधक फवारणी करावी व मच्छरदानी चे वाटप करावे अशी परिसरातून मागणी होत आहे.
आता सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे . ह्या पावसाळ्याच्या दिवसात जिकडेतिकडे चिखलाचे साम्राज्य पसरलेले आहे. व गंदगी चे वातावरण पसरलेले आहे. त्यामुळे या वातावरणात मोठ्या प्रमाणात डास निर्माण होत असतात. व त्यातून साथीच्या रोगांना आमंत्रण मिळत असतो. त्यामुळे या साथीच्या रोगांना वेळीच रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना म्हणून डास प्रतिबंधक फवारणी करून नागरिकांना त्यांच्या आरोग्याच्या प्रश्न मिटवण्यात यावे. असे नागरिकांमधून मागणी होत आहे व मच्छरदानी उपलब्ध करून द्यावी अशीही मागणी होत आहे.