पत्रकार अग्रवाल यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करावी मातृशक्ती संघटनेची निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्याकडे मागणी—

110

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

शेगाव 5 ऑगस्ट रोजी शेगाव येथील पत्रकार सतीश अग्रवाल यांना रस्त्यावर अडवून मारहाण करणाऱ्या सर्व आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी मातृशक्ती संघटनेतर्फे निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे. याबाबत शेगाव तहसीलदार शिल्पाताई बोबडे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे निर्भीडपणे करणाऱ्या पत्रकारांवर हल्ले करण्याचा आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करावे व त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रतीलीपी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चुभाऊ कडू बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे महाराष्ट्राचे मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक यांच्यासह वरिष्ठांना पाठविण्यात आले आहे.
या निवेदनाद्वारे मातृशक्ती संघटनेच्या अध्यक्ष सौ. वैशालीताई तायडे मातृशक्ती संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष सौ रूपालीताई वानखडे मातृशक्ती संघटनेच्या राष्ट्रीय सचिव डॉक्टर शबनम शेख मातृशक्ती संघटनेच्या राष्ट्रीय सहसचिव माधुरीताई शर्मा मातोश्री मल्टीपर्पज फौंडेशनच्या अध्यक्ष सौ. राजश्री राजकुमार व्यास सौ. स्मिता प्रशांत खत्री कु. काजल धुराब्दे आदींच्या सह्या आहेत.