खासदार नवनित राणा कौर यांची तब्येत खालावली; श्वास घेण्यास त्रास झाल्याने त्यांना मुंबई च्या लीलावती हाँस्पिटल ला केले दाखल

854

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

नागपुर: १४ आँगस्ट २०२०
अमरावती च्या खासदार नवनीत राणा यांची प्रकृती काल अचानक खालावली. त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यामुळे नागपुर च्या वोक्हार्ट हाँस्पिटल प्रशासनाने त्यांना मुंबई च्या लीलावती हाँस्पिटल मध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला.
दरम्यान विमानाची सोय ना झाल्याने नागपूर मुंबई महामार्गाने च खा. नवनित कौर राणा यांना मुंबई ला हलविण्यात आले. त्यांच्यावर आता मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचार केले जात आहेत. सध्या त्यांच्यावर नागपूरच्या वोक्हार्ट रुग्णालयात उपचार सुरु होते. आता त्या मुंबईला रवाना झाल्या. त्यांचेसोबत त्यांचे पती आ. रवी राणा हे सुद्धा मुंबई ला गेले आहेत. खा. नवनीत राणांना ६ ऑगस्टला करोनाची बाधा झाली. सध्या राणा कुटुंबात आमदार रवी राणा यांचे वडील, आई, बहीण, बहिणीचे पती, भाचा, पुतण्या यांच्या सह खासदार नवनीत राणा यांची मुलगी आणि मुलगाही करोनाबाधित आहेत.
मुंबईच्या लीलावती रुग्णालयात नवनित कौर यांच्या वर उपचार सुरु झाले असुन सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. मुंबईत डॉ. जलील पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवनीत राणांवर उपचार सुरू आहेत. त्यांच्या मुलांवर अमरावती येथील घरीच उपचार सुरू आहेत.