अशोक रोकडें एक कोरोना योद्धा; कोल्हापूरवर कुठलही संकट आलं तर त्यानं पयलं व्हाईट आर्मीच्या छाताडावर पाय देऊनच आत प्रवेश करायचा – अशोक रोकडेंच्या या वाक्याने सर्वांग शहारलं :- समीर मुजावर

192

 

प्रतिनिधी प्रसाद गांधी.

कोल्हापूर – परवा एका ब्लड सॅच्युरेशन 88/89 झालेल्या कोविड रुग्णाला शहरात कुठेही उपचारासाठी दाखल करायला जागा मिळत नव्हती तेंव्हा महापालिका आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी साहेबाना मी रात्री 11 वाजता कॉल केला. तेंव्हा कोणतीही वेळ न दवडता त्यांनी मला जैन बोर्डिंग मध्ये व्हाईट आर्मी आणि मेडिकल असोसिएशन,निमा असोसिएशन,महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या व्हाईट आर्मी कोविड केअर सेंटर येथे त्या रुग्णाला पाठवण्याचा सल्ला दिला. मीही तात्काळ अशोक रोकडे यांना कॉल केला आणि त्या रुग्णाची कंडिशन त्यांना कळवली तेंव्हा अशोक रोकडे म्हणाले की भावा पाठव रे मी बाहेर वाट बघत उभारतो त्या पेशंटची..पण लक्षात घे कोल्हापूरवर कोणतही संकट आलं तर या अशोक रोकडेच्या व्हाईट आर्मीच्या छाताडावर पाय देऊनच त्यानं आत यायचं…!!! नाही त्याला तिथंच रोखला तर व्हाईट आर्मीचं नाव नाही घेणार..
मी काही काळ स्तब्धच झालो…अशोक रोकडेंच्या त्या वाक्यात किती दम होता..माझ्या अंगावर शहारे उभे राहिले…खरंच या ‘व्हाईट आर्मी’नं जे अशक्य होते ते शक्य करून दाखवलंय आज पर्यंत आलेल्या संकटाला परतवून लावण्यासाठी…
ला चांगलं आठवतंय 25 वर्षांपूर्वी मी नुकताच पत्रकार म्हणून नवाकाळ मध्ये सुरुवात केली होती.आणि त्यावेळी माझ्या एका मित्राने मला अशोक रोकडे नावाच्या एका व्यक्तीला भेटवले होते.त्यावेळी मी जीवन मुक्ती सेवा संस्थेबाबत एक रिपोर्ट संपुर्ण महाराष्ट्र भर प्रसिद्ध केला होता.तो रिपोर्ट वाचून महाराष्ट्रात अशोक रोकडेंच्या त्यावेळच्या रोपट्याचे नाव पोहचले होते, पण आज त्या इवल्याशा रोपट्याचे वटवृक्ष बनले आहे.आणि हाच वटवृक्ष अनेक समाजकार्याला वाहून घेतलेल्या छोट्या मोठ्या संस्थारुपी पारंब्याना हाताशी धरून संपुर्ण कोल्हापूरच नाही तर देशभरात समाज कार्यात आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात काम करत आहे.अशोक रोकडे आणि व्हाईट आर्मी मध्ये कार्यरत त्यांच्या जवानांना मनापासून सॅल्युट आहे…आणि विशेष म्हणजे अशोकराव आणि त्यांच्या पत्नी बरोबरच त्यांच्या कन्या सुद्धा समाजासाठी अहोरात्र धडपडत आहेत.
तशी दररोज माझी आणि अशोक रोकडे यांची भेट फोन द्वारेच होते..सायंकाळी मी अशोकरावांचा फोन येणार याचा अंदाज बांधूनच असतो. असो, मी ज्या प्रशांतला व्हाईट आर्मीच्या कोविड केअर सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल केले, तो प्रशांत ज्यावेळी मला त्याने फोन केला त्यावेळी बोलू शकत नव्हता, अंगात 101 ताप,धाप लागलेली,ढास लागल्यासारखा खोकला तरीही तो आणि त्याचा दाजी कुठेही बेड अव्हेलेबल करा पण उपचार सुरु करा अशी विनंती करत होते.मी दोन चार रुग्णालयात विचारपूस सुद्धा केली.माझे मित्र डॉ.संदीप पाटील सुद्धा माझ्या सांगण्यावरून सगळीकडे विचारपूस करत होते. पण कुठेच जागा शिल्लक नव्हती, प्रशांतला कोणत्याही परिस्थितीत ऑक्सिजन देणे गरजेचे बनले होते.पण आता काय करायचे या चिंतेत मी ही पुरता हादरून गेलो.शेवटी आयुक्त साहेबाना विचारले तर त्यांनी सुद्धा एक दोन रुग्णालयात जागा मिळते का पाहून,शेवटी व्हाईट आर्मीचे नाव सुचवले.मी चटकन अशोक रोकडे यांना कॉल केला..आणि परिस्थिती सांगितली,तेंव्हा एखादा एम.डी डॉक्टर असल्यासारखे अशोक रोकडे यांनी माझा फोन सुरू असतानाच आपल्या जवानाला ए…O2 चा एक बेड शिल्लक ठेव रे म्हणून हाक मारून सांगितले आणि ते स्वतः जैन बोर्डिंग च्या गेटवर त्या पेशंटची वाट पहात उभे राहिले..पूर्ण सॅनिटायझ करून रुग्ण दाखल करून घेतला आणि अवघ्या तासाभरात त्याच्या ब्लड सॅच्युरेशनची लेव्हल 89 वरून 95 वर नेली.त्यावेळी मी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.आबाजी शिर्के यांच्याशी रात्री बराच वेळ फक्त त्या प्रशांतला स्टेबल करा म्हणून विनंती करत होतो.आणि झालं सुद्धा तसंच शेवटी रात्री 1 वाजता अशोकरावांचा फोन आला भावा तुझा पेशंट आता स्टेबल झालाय बघ…झोप बिनधास्त..।असं म्हणून अशोक रोकडेंनी फोन ठेवला..मी ही निश्चिन्त झालो…त्यानंतर दररोज मी कॉल करून व्हाईट आर्मीच्या या कोविड सेंटरची खबरबात घेतोच आहे..
अक्षरशः ब्लड सॅच्युरेशन 30 पर्यंत आलेल्या आणि कुटुंबीयांनी आशा सोडलेल्या रुग्णांना या व्हाईट आर्मी कोविड सेंटर मध्ये मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांच्या टीम द्वारे ऑनलाइन उपचार पद्धती सांगून आणि तिथल्या तज्ञ नर्सिंग स्टाफ तसेच व्हाईट आर्मीच्या जवानांच्या सहकार्याने कोरोनाच्या विळख्यातून बाहेर खेचून आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सर्वजण करत आहेत आणि हे सगळं सुरू आहे अगदी मोफत..त्यामुळे रुग्ण सुद्धा बरे झाल्यानंतर अक्षरशः दुवा देत तिथून हशीखुशीत आपल्या घरी निघून जातायत…पण अशोक रोकडे मात्र आपल्या साथीयो के साथ तिथंच बसलेत डेरा टाकून …आलेली संकटे परतवून लावण्यासाठी ..माझ्या सामाजिक कार्यात वाहून घेतलेल्या एका सच्चा मित्रासाठी माझे हे दोन शब्द पुरेसे नाहीत. असे समीरमुजावर म्हणतात.
पण मी प्रयत्न केलाय.. अशोकराव असंच कार्य सुरू ठेवा.
तुमच्या या कार्याला दखल न्यूज चा ही सलाम..

*दखल न्यूज भारत*