वरंध घाट ढासळतोय जियो केबल घाटरस्त्याच्या जीवावर घाटाचा इतिहास पुस्तकी राहणार ?

186

 

प्रतिनिधी / प्रसाद गांधी.

महाड :- कोकण व पश्चिम महाराष्ट्रला जोडणारा महत्वाचा दुवा असलेला म्हाप्रल पंढरपूर मार्गावरील वरंध घाट खचत असून सदरचा मार्ग वापरणे अडचणीचे झाले आहे या मार्गावर रस्त्यालगत चर खोदून टाकलेल्या जियो केबल मुळे रस्ता खचत आहे. या वर्षामधील ही दुसरी घटना असून पहिली घटना पुणे जिल्हा हद्दीत घडली होती तर दुसरी घटना रायगड जिल्ह्या हद्दीत घडल्याने माती व रस्ता खचण्याचे सातत्य कायम राहिल्यास भविष्यात सदरचा मार्ग इतिहास जमा होईल व फक्त पुस्तकी राहील अशी भीती वजा विश्वास चालक व्यक्त करत आहेत. म्हाप्रल – पंढरपूर राज्यमार्गावर वरंध घाट तथा वरंधा घाट नावाचा २० किलोमीटर लांबीचा डोंगरी रस्ता आहे. हा घाट सह्याद्रीच्या उभ्या धारेवर असलेल्या कावळ्या किल्ल्याला दुभंगून देशावरून कोकणात उतरतो. घाटाच्या समोरच्या डोंगरकुशीत, गर्द झाडीत समर्थ रामदासस्वामींची शिवथरघळ आहे. महाडपासून २५ किलोमीटर, पूर्व पुण्यापासून ११० किलोमीटर अंतरावर आहे. वरंधा घाटरस्त्यावर मुख्य आकर्षण असलेले वाघजाई माता मंदिर आहे. या ठिकाणापासून, दरीतील आणि धबधब्यांवरील सुंदर दृश्ये दिसतात. कोंकणाच्या दिशेला ३००० फुटांच्या खोल दरीमुळे वस्त्यांसह अतिशय खडबडीत खोरी आहेत.
, वाघजाई समोरचा एक भलामोठा डोंगर अजस्र शिवलिंगाच्या आकाराचा आहे. पावसाळ्यात त्याच्या चहुअंगावरून असंख्य धबधबे कोसळत असतात.
वाघजाईच्या पुढे लगेच एका खिंडीतून घाट डावीकडे वळतो. या खिंडीच्या दोन्ही अंगांचे डोंगर म्हणजेच कावळ्या ऊर्फ मनमोहनगड किल्ला आहेत. या गडाच्या वाघजाईकडील बाजूच्या डोंगरामध्ये नऊ खोदीव टाकी आहेत. तर दुसऱ्या बाजूस अशीच काही टाकी व शिबंदीच्या घरांचे अवशेष दिसतात. इतिहासात फारसा परिचित नसलेल्या या गडावर प्राचीन काळापासून वाहत्या असलेल्या या घाटवाटेवर लक्ष ठेवण्याचे काम होते. अशी ही घाटवाट पुढे ब्रिटिशांनी इ.स. १८५७ मध्ये सव्वा लाख रुपये खर्चून पक्की केली. मात्र या नंतर या मार्गाकडे हवे तसे लक्ष देण्यात आले नाही
या मार्गावर 20 ते 25 वर्ष पूर्वी पुणे जिल्हा हद्दीत धरण ची निर्मिती करण्यात आली होती त्या वेळी काही प्रमाणात रस्ता बदलण्यात आला होता मात्र वरंध ते वाघजाई दरम्यान मार्गाला पूर्वी होता तसाच राहिला होता तो आज पर्यत गेल्या वर्षी या मार्गावर जियो केबल चे काम करण्यात आले. या कामा बाबत अनेकदा नाराजी व्यक्त करण्यात आली या केबल च्या कामा नंतर तीन वेळा रस्ता मातीसह खचला होता गतवर्षी रस्ता खचल्याने जवळपास 6 महिने पेक्षा मार्ग बंद होता या नंतर रस्ता सुरू झाला खरा मात्र जागो जागी पडलेल्या खड्ड्यामुले वाहतूक कमी झाली होती
नुकत्याच पावसाळा मध्ये पुणे जिल्हा हद्दीत या केबल मुले रस्ता खचला होता तर गुरुवारी मुसळधार पावसात रायगड हद्दीत रस्ता व कठडा खचल्याने सदरचा मार्ग बंद होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे
गेली अनेक वर्षे पाऊस दरड झेलत वाहतुकीसाठी पर्यटन साठी आपल्या नावलौकिक प्रमाणे सेवादेणार मार्ग आज काही कामचुकार ठेकेदार याच्या कामाच्या पद्धतीमुळे पूर्ण पणे आतून खचत आहे केबल चे काम या मार्गाच्या मुळावर आले असून भविष्यात या मार्गाचे सर्वेक्षण न झाल्यास सदरचा मार्ग होण्याची शक्यता वाढीस लागली आहे.

*दखल न्यूज भारत*