वरवडे पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या बापट कनिष्ठ महाविद्यालयात उद्यापासून ११ वी प्रवेश प्रक्रिया

0
146

 

प्रतिनिधी / गौरव मुळ्ये.

रत्नागिरी दि १३:- वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ वरवडे, संचलित श्रीम. पार्वती शंकर बापट कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय तसेच वाणिज्य महाविद्यालय वाटद खंडाळा, ता.जि.रत्नागिरी येथे सन-२०२०/२१ साठी अकरावी प्रवेश प्रक्रिया शुक्रवार दि. १४-०८-२०२० पासून सुरु होत आहे. या महाविद्यालयात अनुभवी शिक्षकवर्ग, १००% निकालाची परंपरा,सुसज्ज इमारत, सुसज्ज प्रयोगशाळा, भव्य क्रीडांगण तसेच या महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर गेलेले अनेक माजी विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत, अशाप्रकारे वैशिष्ट्यपुर्ण अशा या महाविद्यालयात आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ वरवडे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.सुभाषराव विचारे तसेच सर्व संस्था पदाधिकारी व मुख्याध्यापक तथा प्राचार्य , पर्यवेक्षक यांच्यावतीने करण्यात आले. अधिक माहितीसाठी 02357. 243270 या क्रमांकवर कार्यालयाशी व प्राचार्य 94043 71936 तसेच प्रत्यक्ष कार्यालयात संपर्क साधावा.
१४ ऑगस्ट २०२० ते १७,१८,१९ ऑगस्ट २०२० चार दिवस प्रवेश अर्ज देणे व स्विकारणे ,२०,२१,२४ ऑगस्ट २०२० प्रवेश अर्जाची छाननी,तपासणी व गुणवत्तेनुसार निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करणे.,२५ ऑगस्ट २०२० दुपारी ३.०० वाजेपर्यत निवड यादी व प्रतिक्षा यादी सुचना फलकावर लावणे २६,२८,२९,३१ ऑगस्ट २०२० निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे ,२ व ३ सप्टेंबर २०२० प्रवेश शिल्लक असल्यास प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना मुळ कागदपञाच्या आधारे प्रवेश देणे,४ व ५ सप्टेंबर २०२० दुसऱ्या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश शिल्लक असतील तर मूळ कागदपञाच्या आधारे प्रवेश देवून प्रवेश प्रक्रिया पुर्ण करणे ,७ व ८ सप्टेंबर २०२० रिक्त राहिलेल्या जागांवर एटीकेटीधारक विद्यार्थ्यांना प्रवेश देणे कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वी चा वर्ग सुरु करणेबाबत शासनाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर सुरु करण्यात येतील वरील वेळापञकात मा.शिक्षणउपसंचालक कोल्हापूर यांच्या आदेशानुसार बदल होऊ शकतो असे बापट कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी कळविले आहे.