दखल न्युज भारतचे गोंदिया उपजिल्हा प्रतिनिधी यांना मातृशोक.. -यशोदा हरिदास टेंभुर्णीकर यांचे अल्पशा आजाराने निधन..

संजय टेम्भुरने/कार्यकारी संपादक

गोंदिया प्रतिनिधी :-
दखल न्युज भारत चे गोंदिया उपजिल्हा प्रतिनिधी राकेश टेंभुर्णीकर यांच्या आई,श्रिमती यशोदा हरिदास टेंभुर्णीकर ह्या मनमीळावु होत्या,समाजातंर्गत किंवा इतर लोकांना काही मदत लागली की,त्या समोर येत होत्या.त्यांनी आपल्या आयुष्यात समाज सेवेसाठी खूप प्रयत्न केले.कोणताही व्यक्ती त्यांच्या जवळ गेला की ते अगदी आपुकीच्या भवणाने बोलत होत्या.
अशा मदगार व मनमिळावू स्वभावाच्या यशोदाबाई टेंभुर्णीकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.
श्रिमती यशोदा टेंभुर्णी कर यांना,”दखल न्युज भारत परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!