पत्रकारावर हल्ला करणाऱ्या आरोपींचा 14 ऑगस्टपर्यंत पीसीआर… आणखीन ऐकास अटक

आरोपीविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत विविध कलम अन्वये गुन्हा दाखल

125

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

शेगाव येथील निर्भीडपणे पत्रकारिता करणारे सतीश अग्रवाल यांना मारहाण करून गंभीर जखमी करणाऱ्या दोघा आरोपींना 14 ऑगस्टपर्यंत पीसीआर घेण्यात आला आहे. 5 ऑगस्ट रोजी अकोला येथून लोहारा मार्गे शेगाव कडे आपल्या दुचाकीने पत्रकार सतीश अग्रवाल येत होते त्यावेळी लोहारा फाट्याजवळ त्यांची गाडी अडवून लोहारा येथील सुशील सिंगल ठाकूर व निलेश उर्फ बबलू सिंगल ठाकूर यांच्यासह त्यांच्या अज्ञात पंधरा ते वीस जणांनी अग्रवाल यांना मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले व त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व नगदी 17 हजार रुपये लंपास केले याप्रकरणी उरळ पोलिसांनी वरील दोघा आरोपींना भादवि कलम 327, 323,294,506,34 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली होती या घटनेची माहिती कळताच विविध पत्रकार संघटना व शेगाव येथील मातृशक्ती संघटनेच्यावतीने घटनेचा तीव्र निषेध करून वरील आरोपीविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कारवाई करण्याची मागणी करण्यात आली उरळ पोलिसांनी वरील दोन्ही आरोपींना अधिक चौकशीसाठी मा.न्यायालयाने 14 ऑगस्टपर्यंत पीसीआर मिळविले आहे.तसेच सुशील सिंगल व निलेश सिंगल या दोन्ही आरोपी विरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा सुद्धा दाखल केले असुन आणखीन ऐक आरोपी हर्षल राधेश्याम सिंघल रा.लोहारा याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी फरार असलेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत असून लवकरच त्यांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती उरळ पोलीसानकडुन मिळाली आहे.