मनसे ने केले कुलगुरू डॉ चौधरी यांचे अभिनंदन..!

125

( गजानन ढाकुलकर नागपूर )

नागपूर :- राष्ट्रसंताच्या नावाने असलेल्या विद्यापिठात अंतर्गत राजकारण, जातीयवादी शक्तींचे दबावगट मुळीच नको, हे शैक्षणिक केंद्र आहे, आपल्या कार्यकाळात अश्या शक्तींना डोके वर काढू देऊ नका, शिक्षण व गुणवत्ता हा निकष लावा, वेळप्रसंगी आक्रमक पवित्रा घ्या तरच विद्यापिठाचा लौकिक वाढेल असे मत मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी नागपूर विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांचे जवळ व्यक्त केले व डॉ चौधरी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले, विद्यापीठातील महत्वपूर्ण घटक म्हणजे विद्यार्थी त्याला केंद्रस्थानी ठेवून निर्णय घ्यावे तसेच चांगल्या कामासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव आपल्या सोबत राहील असे सांगून हेमंत गडकरी यांनी डॉ सुभाष चौधरी यांना उज्वल कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या, आपण ज्या भावना व्यक्त केल्या त्याच माझ्या कृतीतून दिसतील असे यावेळी कुलगुरू डॉ चौधरी यांनी सांगितले.