अट्टल दारू विक्रेते व मोहा दारू गाळणारे यांचेवर चिमूर पोलिसांचा दणका

0
147

तालुका प्रतिनिधी- दिपक पाटिल
चिमूर-
अनेक दिवसांपासून चिमूर पोलीस दारूबंदीच्या कारवाही करीत आहेत परंतु अवैद्य मोहा दारू गाळणारे हे जंगल परिसरामध्ये मोहा दारू गाळीत आहे अश्यावरही चिमूर पोलिसांनी दिवस रात्र एक करून लपून छपून कारवाही करून दारू विक्रेत्यांचे मुसके बांधले आहे. परंतु अट्टल दारू विक्रेते कायद्याला न जुमानता लपून मोहा दारू गाळत असल्याची माहिती पडताच माणूस मारी जंगल परिसर कावरे यांचे बोडी जवळ चिमूर पोलिसांनी धाड टाकून मोहा दारू मोहा सडवा व दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण 2.91.200 रू चामाल उध्वस्त केला कारवाही दरम्यान आरोपी सुभाष वाघमारे राहणार कवडशी रोडी व गणेश नान्हे राहणार केसलापुर हे जंगलाचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाले फरार आरोपी वर दारूबंदी कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आले

सदरची कारवाही मा उप विभागीय पोलीस अधिकारी चिमूर श्री अनुज तारे , पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे ठाणेदार चिमूर यांचे मार्गदर्शनात पोहवा विलास निमगडे , पोशी सचिन गजभिये होमगार्ड सुभाष सहारे, सचिन गायकवाड यांनी पार पाडली.