शिवसेना चे एक पाऊल महिला सक्षमीकरणाकडे

195

 

सुनील उत्तमराव साळवे(9637661378)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत

ठाणे / मुंबई: 13 आँगस्ट 2020
महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, त्यांनी स्वावलंबी व्हावे यासाठी शिवसेना पक्षाने एक पाऊल महिला सक्षमीकरणाकडे टाकले आहे. ठाणे महापालिका परिवहन समिती सदस्य राजेश मोरे तसेच नगरसेविका रुचिता मोरे यांनी त्यांच्या प्रभागात नेहमीच महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आले आहेत.
वर्षभर महिलांना रिक्षा प्रशिक्षण शिबीर राबवले.या प्रशिक्षण शिबिरात जवळ जवळ २०० महिलांनी प्रशिक्षण घेतले, प्रशिक्षणासोबत लर्निंग लायसंन्स,परमंनट लायसंन्स, ऑटो रिक्षा batch, तसेच कच्चे व पक्के परमिट देखील काढून देण्याची संपूर्ण व्यवस्था करून देण्यात आली . या कार्यक्रमात महिला उत्तम प्रकारे प्रशिक्षित होवून ऑटो रिक्षा चालविण्यास सक्षम झाल्या आहेत. तर यापैकी 70 महिलांचे बॅचेस काढून त्यांना ड्रायव्हींग लायसन्सही देण्यात आले आहेत. आज त्यातील काही महिलांना महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑटो रिक्षा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला खासदार राजन विचारे,शहरप्रमुख हेमंत पवार,महापालिका आयुक्त विपीन शर्मा,नगरसेविका रुचिता मोरे,उप शहर प्रमुख मिलिंद मोरे,विभाग प्रमुख दीपक म्हस्के,उप विभाग प्रमुख अरुण अवघडे,अनिल बोर्डे, कोंडू यादव,अमर लोखंडे, ज्ञानेश्वर बागवे, सुभाष बालगुडे, शाखाप्रमुख जिवाजी कदम, धोंडीराम मोरे,मनोज पवार, अभिजित शिरकर, नारायण थिटे आणि शिवसैनिक उपस्थित होते.