Home महाराष्ट्र अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, अन्यथा आमरण उपोषणाला बसणार – सौ. सविता...

अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, अन्यथा आमरण उपोषणाला बसणार – सौ. सविता जिचकार (पं. स. सदस्य)

299

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

कोराडी / नागपुर: १३ आँगस्ट २०२०
नागपुर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात असलेल्या बाभुळखेडा, तांधुळवणी,चिचोली, लोंणखैरी, गुमथी,खापा,नांदा,कोराडी, खापरी या गावात अतिवृष्टी व मुसळधार पाऊस मागील ४ दिवसांत पडला आहे.
पुरामुळे शेत पीक व टमाटर रोपे पूर्णतः पुरा मुळे वाहून गेले. शासनाने याकरिता अति तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अन्यथा मी आमरण उपोषणाला बसणार असा इशारा कोराडी पं. स. सदस्या सौ. सविता रामचंद्र जिचकार यांनी दिला आहे.
एक तर पहलेच लाँक डाऊन मुळे शेतकरी अडचणीत आहेत. हातात आलेले उभे पीक पुरामुळे वाहुन गेले त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या मागे शासनाने खंबीर उभे राहण्याची गरज आहे. शासनाने पटवारी व तहसीलदार यांचे माध्यमातून अतितात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी पं. स. सदस्य सौ. सविता जिचकार यांनी केली आहे.

Previous articleमंगरुळपीर येथे गणेश विसर्जनासाठी कुत्रिम हौद तयार करून देण्याची यंग सिटीझन टीमची मागणी
Next articleशिवसेना चे एक पाऊल महिला सक्षमीकरणाकडे