मंगरुळपीर येथे गणेश विसर्जनासाठी कुत्रिम हौद तयार करून देण्याची यंग सिटीझन टीमची मागणी

126

 

फुलचंद भगत
मंगरुळपीर-दरवर्षी मंगरुळपीर शहरामध्ये गणेशउत्सव मोठ्या उत्साहात आणी भक्तीभावनेने साजरा केला जातो. गणेश विसर्जनाच्या वेळी मात्र गणपतींच्या मूर्तींचे विसर्जन नद्या,तलाव,विहिरी, आदी ठिकाणी करण्यात येते. त्यामुळे जलप्रदूषण होऊन पिण्या योग्य पाणी सुद्धा अशुद्ध होते. सध्या कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असल्या मुळे विसर्जनाच्या दिवशी गर्दी कमी व्हावी आणि कोरोनाचे संक्रमण थांबावे या करता या वर्षी सुद्धा यंग सिटीझन टीम ने मंगरूळपीर येथील स्थानिक नगरपरिषद याना पक्के कुत्रिम हौद तयार करण्या संदर्भात मागणी केली आहे.
गणेशविसर्जनासाठी यंग सिटीझन टीम ने 2018 मध्ये स्वतः पुढाकार घेऊन कुत्रिम हौदाची व्यवस्था केली होती आणि संपूर्ण मंगरुळपीर शहरात जनजागृती केली असून शहरातील नागरिकांना गणेश मुर्त्यांचे विसर्जन कुत्रिम हौदामध्ये करण्यास प्रोत्साहित केले होते तसेच मंगरुळपीर शहरातील पाच ठिकाणी कुत्रिम हौदाची व्यवस्था केली होती. पण दरवर्षी यंग सिटीझन टीम सारख्या संस्थांना हे कार्य करणे शक्य होत नसून हि जबाबदारी मंगरुळपीर येथील स्थानिक प्रशासनाची आहे.त्या करता यंग सिटीझन टीम ने ही बाब लक्षात घेता गणेश विसर्जनाच्या अगोदरच पक्के कुत्रिम हौद तयार करण्या संदर्भात मंगरुळपीर येतील स्थानिक प्रशासनानं निवेदने दिलीत.ही निवेदने मंगरुळपीर येथील नगरपरिषद मुख्याधिकारी, याना देण्यात आले. या वेळी यंग सिटीझन टीमचे सत्यम गिरडकर म्हणालेत कि NGT ने सांगितलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार गणेश विसर्जनाच्या वेळी शहरातील स्थानिक प्रशासनाने कुत्रिम हौद तयार करून लोकांना गणेश विसर्जन कुत्रिम हौदामध्ये करण्यास प्रोत्साहित करावे . जेणेकरून विसर्जनाच्या दिवशी कुत्रिम हौदा जवळ सोसिअल डिस्टंसिंग चे पालन व्हावे अशी व्यवस्था करत गणेश विसर्जन होईल आणि कोरोनाचे संक्रमण वाढणार नाही.अशी खात्री आहे कि स्थानीक प्रशासन या संदर्भात योग्य ती व्यवस्था करेल.
निवेदन देते वेळी यंग सिटीझन टीमचे संस्थापक अध्यक्ष सूचित देशमुख,सत्यम गिरडेकर करण मुंढरे अनुप इंगळे, उपस्तित होते.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206
9763007835