महादुला कोराडी चे युवा भाजपा नेता जितेश भगत पार्टी सोडणार

596

 

सुनील उत्तमराव साळवे
(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

महादुला-कोराडी / नागपुर :१३ आँगस्ट २०२०
महादुला कोराडी येथील भाजपा कार्यकर्ता यांच्यात सध्या निराशाचे वातावरण निर्माण झाले आहे. सत्तेत राहुन कामे झाली नाहीत आणि आता सत्ता नाही तर समोर आपले भविष्य काय? अशा चिंतेत महादुला-कोराडी येथील भाजपा कार्यकर्ता आहेत. येथील ओबीसी सेल चे युवा भाजपा नेता तथा कांन्क्टैक्टर जितेश भगत लवकरच भाजपा सोडणार असे चिन्ह दिसत आहे.
दखल न्युज भारत ला पाठवलेल्या एका संदेश मध्ये त्यांनी खुलून आपली नाराजी व्यक्त केली आहे. सत्ता असुनही महादुला कोराडी त आपले एक काम होत नाही. वरिष्ठ सत्ताधारी आपले ऐकत नाही. मागील १६-१७ वर्षापासून ते भाजपा चे कट्टर कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात. प्रत्येक निवडणुकीत त्यांनी पक्षासाठी ईमानदारी ने काम केले पण स्थानिक पक्षनेतृत्वाने त्यांचे एकही काम केले नाही. त्यामुळे ते लवकरच आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपा सोडणार असे जितेश भगत यांनी दखल न्यूज भारत ला माहिती देतांना सांगितले.