कोळंबी येथे शेतकऱ्यांना गांडूळ खत बनविण्याचे प्रशिक्षण

दर्यापूर(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
दर्यापूर तालुक्यातील कोळंबी येथे ग्रामिण व कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत यवतमाळ येथील मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांना गांडूळ खत कसे बनवावे याबाबत प्रशिक्षण देण्यात आले
शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतीकरिता गांडूळ खत कसे तयार करावे याबद्दल महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु श्रद्धा अशोक काकड गावातील सर्व शेतकऱ्यांना सोप्या पद्धतीने समजावून सांगितले यावेळी प्राचार्य ठाकरे, उपप्राचार्य कडू, प्रा पी आर चौरे ,यांचेही मार्गदर्शन गावातील शेतकऱ्यांना लाभले सदर कार्यक्रमाला गावातील शेतकरी मारोतराव मोरे, राजाराम घाटे, श्रीकृष्ण नांदे व इतर शेतकरी उपस्थित होते