हिरापुर सिल’ एकाच दिवशी आढळले तिन कोरोना पॉझिटिव्ह

155

 

सावली (सुधाकर दुधे)
सावली तालुक्यातील हिरापुर येथे दि.११ ऑगस्ट ला एकाच दिवशी तिन महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली असून हिरापुर हे गांव ‘सिल’करण्यात आले आहे.
सावली पासून जवळच असलेल्या हिरापुर येथे तिन महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.सदर महिला ह्या मे.गुरुबक्षानी या कंपनीमध्ये रस्ता बांधकामच्या कामावर मजुरीने जात होत्या.सदर कंपनीमध्ये बाहेर राज्यातील कामगार सुद्धा कामावर आहेत.सावली तालुक्यात आतापर्यंत फक्त तिन कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते.परंतु परप्रातियांतील नागरिकांचा तालुक्यात शिरकाव झाल्याने दि.११रोजी पुन्हा तिन महिला एकाच दिवशी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सदर कंपनी तालुक्यात रस्ता बांधकामाचे काम करीत आहे.या कंपणीमध्ये परप्रांतातील नागरिक मोठ्या प्रमाणात कामावर असून प्रशासनामार्फत व कंपनीद्वारे कामगारांची तपासणी होणे गरजेचे असतांना मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने तालुक्यात कोरोना संसर्गजन्य रोगाने शिरकाव केल्याने तालुक्यातील जनता दहशतीत असल्याचे चित्र दिसत आहे.