Home सामाजिक  निसर्गप्रेमी सर्पमित्रांकडून नाग सापाला जीवनदान

निसर्गप्रेमी सर्पमित्रांकडून नाग सापाला जीवनदान

152

सावली (सुधाकर दुधे)

पावसाळ्याच्या दिवसात सर्वत्र पाणी साचुन असते बिळामध्ये व अन्यजिव असणाऱ्या वस्तीमध्ये पाणी साचुन राहते अशातच साप विंचु आपल्या नविन जागेत आसरा शोधत असतात आणि मनुष्याच्या निर्दशनास आल्यास त्या जीवाला आपले जिव गमवावे लागते तर काही लोक सर्पमित्राच्या मदतीने त्यांना जीवनदान देत असतात.अशीच घटना सावली तालुक्यातील निमगाव येथील विनोद देवतळे यांच्या घरी आढळलेल्या सहा फुटाच्या नाग सापाला वाचवून जंगलात सोडण्याचे कार्य आज काही सर्पमित्रांतर्फे करण्यात आले. प्रकाश पेंदाम व गौरव यांपलवार अशी या सर्पमित्रांची नावे आहेत.

सकाळच्या सुमारास देवतळे यांच्या घराशेजारी हा साप आढळला व त्याने गावात एकंच खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर सर्पमित्र तिथे वेळेत हजर झाले आणि नंतर वनविभागाच्या मदतीने सापाला पकडून जंगलात सोडले व त्याला जीवनदान दिले.

मागील १० वर्षापासून प्रकाश पेंदाम आणि गौरव यांपलवार हे दोघे सर्पमित्र इंवरन्मेंट एण्ड रिसर्च सोसायटी या संस्थेमार्फत चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत आहेत. या संस्थेअंतर्गत आतापर्यंत ५०० हुन अधिक सापांना जीवनदान देण्यात आले आहे. आसपासच्या गावातील नागरिकांना साप आणि पर्यावरणाबद्दल जागरुक करण्याचे काम देखील ही संस्था करत आली आहे.

Previous articleजिल्हाधिकारी यांची प्रतिबंधीत भागाची पाहणी
Next articleहिरापुर सिल’ एकाच दिवशी आढळले तिन कोरोना पॉझिटिव्ह