जिल्हाधिकारी यांची प्रतिबंधीत भागाची पाहणी

0
105

 

तालुका प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
उपजिल्हा प्रतिनिधी-निलय झोडे

साकोली-मा.जिल्हाधिकारी साहेब भंडारा यांनी साकोलीतील प्रतिबंधीत क्षेत्र असलेले प्रगती कॉलनी व श्रीनगर कॉलनी या भागांची पाहणी केली.तसेच कोरोना प्रतिबंधासाठी नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या उपाय योजनांची माहिती घेतली.यावेळी कोरोना बाधीतांच्या संख्येत वाढ होऊ नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या आहेत.नागरीकांनी अनावश्यक घराबाहेर पडु नये, बाहेर पडल्यास मास्कचा वापर करावा, वारंवार हात स्वच्छ धुवावेत तसेच मानवी साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टंसीग नियमांचे पालन करावे अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना केल्या.यावेळी मा.तहसीलदार साहेब साकोली,मा.पोलीस निरीक्षक साकोली,व मुख्याधिकारी न.प.साकोली हे उपस्थित होते.