खळबळजनक घटना, विधुतच्या धक्याने सालगड्याचा म्रुत्यु ,नवरगाव येथिल घटना

214

 

वणी : परशुराम पोटे

वणी तालुक्यातील शिरपुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या नवरगाव (उमरी)येथे विधुत च्या धक्याने सालगड्याचा म्रुत्यु झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
विलास मोहुर्ले(४३)रा.खेडी ता.सावली जि.चंद्रपुर असे म्रुतकाचे नाव आहे. विलास मोहुर्लो हे परिवारासह वणी तालुक्यातील नवरगाव (उमरी) येथे प्रभाकर नारायन भोयर यांचे शेतात सालगडी म्हणुन अंदाजे १० वर्षापासुन कामावर आहे. आज दि.१३ आँगष्ट्ला दुपारी २ वाजताचे सुमारास शेतातील विधुत तार जमिनिवर पडुन होते.त्या तारामध्ये शेतातील पाळीव कुत्रा फसला असता त्याला वाचविण्यासाठी विलास गेले.परंतु त्यालाही विधुतचा धक्का लागल्याने विलास चा म्रुत्यु झाला.या घटनेची माहीची शिरपुर पोलीसांना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले.घटना पंचनामा करुन म्रुत्युदेह शवविच्छेदनासाठी वणीच्या ग्रामिण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.