सुरीने सपासप वार करुन तरुणावर जिवघेणा हल्ला,तरुण गंभिर , बोर्डा येथिल घटना,आरोपिला एक दिवसाची पोलीस कोठडी

149

 

वणी : परशुराम पोटे

वणी पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या बोर्डा येथे एका तरणावर सुरीने सपासप वार करु गंभिर जखमी केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
तालूक्यातील बोर्डा येथे पानटपरी व्यवसाय करणारा बंडु माधव तिखट(३५) या तरुणाला त्याच्या घरा समोर असलेल्या गंंगाराम गोविंदा राऊत (५५)हा वारंवार क्षूल्लक वाद घालून त्रास द्यायचा, काल बुधवारी सायंकाळी 5 :30 वाजताचे सूमारास गंगारामने बंडूच्या घरावर चाल करून वाद घातला,या वादात गंगारामने जवळ असलेल्या सूरीने बंडूच्या छातीवर,हातावर व पायावर सपासप वार केले,यात बंडू गंभीर जखमी झाला,शेजारील लोकांनी तातबतोब बंडूला वणीच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.परंतु बंडूची प्रकृती गंभीर असल्याने पूढील उपचारासाठी त्याला चंद्रपूर येथे पाठविण्यात अाले अाहे, या घटनेची माहीती वणी पोलीसांना मिळताच हेड काॅन्स्टेबल बूर्रेवार व दिपक वांड्रसवार हे रूग्णालयात दाखल झाले होते.या घटनेची पोलीसात तक्रार दाखल केली असुन पोलीसांनी आरोपी विरुद्ध भादंवी कलम ३२६ नुसार गुन्हा दाखल करुन आरोपीला मध्यरात्री अटक केली. आज दि.१३ आँगष्टला आरोपीला वणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.