अकोट तालुक्यातील महिला कार्यकारिणी मध्ये महिलांची नियुक्ती वंचित बहुजन आगाडीच्या महिलांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

150

 

अकोट शहर प्रतिनिधि
स्वप्नील सरकटे

आज दि.१२ आॅगस्ट रोजी अकोट येथे आमदार हरिदास भदे यांनी वंचित बहुजन आघाडी सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्या पासून त्यांचे हजारो समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहेत. मा. आ. हरिदासजी भदे यांच्यावरील विश्वास व महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निभावत असलेली महत्वाची भूमिका पाहून दि.१२ ऑगस्ट रोजी अकोट तालुक्यातील वंचित आघाडीच्या महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस सौ. छायाताई कात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अकोट तालुका अध्यक्षा सौ. शारदाताई थोटे व शहर अध्यक्षा सौ. चारुलताताई थेटे यांनी केले. यावेळी माधुरीताई गवई यांच्या सह अनेक महिलांनी राष्ट्रीय कार्यकारिणी सचिव डॉ.आशाताई मिरगे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संग्रामभैया गावंडे माजी आमदार हरीदास भदे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सचिव डॉ.आशाताई मिरगे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस सौ. छायाताई कात्रे,जिल्हा महासचिव डॉ. विजय वाघ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अकोला जिल्हा अध्यक्षा सौ. उज्ज्वलताई राऊत,कार्याध्यक्ष अकिलाताई, जिल्हा महासचिव सौ.मनिषाताई देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष पुंडलिकराव अरबट,परीमल लहाने यांच्या हस्ते नियुक्ती पत्र व पक्ष प्रवेश करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित सेवादल अध्यक्ष हरीदास दहिभात,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रसिद्धी प्रमुख सौ.सुषमाताई कावरे,जिल्हा उपाध्यक्षा रूंदाताई मंगळे, कैलास गोंडचर सौ.सुनिताताई ताथोड,राजु बोचे,नवणीत लखोटीया,नानासाहेब हिंगणकर, कैलास थोटे,जमीरजी इक्बाल, राम म्हैसने,केशव बिलबिले इ.पदाधिकारी व कार्यकर्ते होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शारदाताई थोटे तर आभार प्रदर्शन नागेश आग्रे यांनी केले.