आज गडचिरोली जिल्हयात नवीन 24 कोरोना बाधित तर 18 कोरोनामुक्त

123

 

कार्यकारी संपादिका रोशनी बैस

गडचिरोली : जिल्हयात आज नव्याने 24 जण कोरोना बाधित आढळून आले. तसेच 18 जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली. यामूळे जिल्हयातील सक्रिय कोरोनाबाधितांची आकडेवारी 171 झाली. तर आत्तापर्यंत 629 जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. जिल्हयातील एकुण बाधितांची संख्या 801 झाली.
आज नव्याने 24 बाधित मिळाले त्यामध्ये गडचिरोली 3, भामरागड 1, सिरोंचा 2, अहेरी 7, चामोर्शी 1, धानोरा 7, आरमोरी 1 व कोरची तालुक्यातील 2 रूग्णांचा समावेश आहे. यामध्ये गडचिरोलीमधील बाधित रूग्णाच्या संपर्कातील 3 जण विलगीकरणातील आहेत. भामरागड येथील एकजण पुर्वी मिळालेल्या बाधिताच्या संपर्कातील कामगार आहे. अंकिसा सिरोंचा येथील एकजण वारंगल येथून परतलेला व एक प्रतिबंधात्मक क्षेत्रातील महिला आहे. अहेरी येथील विलगीकरणातील रूग्णाच्या संपर्कातील 2 तर 5 जण तेलंगणा, चंद्रपूर व मुंबई येथून परतलेले प्रवासी आहेत. भेंडाळा चामोर्शी येथील नागपूरला उपचारासाठी गेलेली महिला कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. धानोरा येथील 6 सीआरपीएफ जवानांसह एक रूग्णाच्या संपर्कातील व्यक्ती बाधित आढळून आला आहे. आरमोरी तालुक्यातील एक प्रवासी बाधित अढळला आहे. कोरची येथील एक मार्कटमधील महिला व इतर एकजण रूग्णाच्या संपर्कातील कोरोना बाधित आढळला आहे. अशा प्रकारे नवीन 24 बाधित आढळून आले.
दिलासादायक म्हणजे आज पुन्हा नवीन 18 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यामध्ये भामरागड 1, आरमोरी 6, गडचिरोली 8 व एटापल्ली तालुक्यातील 3 जणांचा समावेश आहे.