डॉ . बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ) पुणे यांना राधानगरी तालुक्यातील समतादुत पद भरण्यासाठी माजी सभापती व विद्यमान सदस्य दिलीप कांबळे यांची निवेदनाद्वारे मागणी

159

 

प्रतिनिधी / उदय कांबळे

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुका अतिदुर्गम व डोंगराळ वाडया वस्त्यांचा असून जिल्हयातील इतर तालुक्यांच्या तुलनेत या तालुक्यात अतिवृष्टी होत असते . या तालुक्यात दाजीपूर अभयारण्याचा जास्तीत जास्त भाग आहे , या भागातील जास्तीत जास्त लोक वाडया वस्त्यावर राहणारे आहेत , या तालुक्यामध्ये अनुसुचित जाती , जमाती व इतर जातीच्या लोकांची संख्या जास्त प्रमाणात आहे , या लोकांसाठी शासन स्तरावरील जास्त योजना आहेत पण सदरच्या योजनांची माहिती ही गावस्तरावर तळागळापर्यंत पोहचत नाही . तरी सदर गोरगरीब लोकांचे जीवनमान उंचावन्यासाठी व त्यांना मुख्य प्रवाहात आणणेसाठी सदर योजना ह्या त्यांचे पर्यंत पोहचवणे आवश्यक आहे , त्यासाठी आवश्यक आसणारे समतादूत या पदाचे महत्त्वाचे काम असते पण या तालुक्यातील गेली तीन चार वर्षे सदरचे पद हे रिक्त आहे , त्यामुळे तालुक्यातील गोरगरीब लोकांना या योजनांपासून वंचीत रहावे लागत आहे , सदरचे रिक्त आसणारे पद हे तात्काळ भरणेत यावे जेणेकरून जे लोक शासनस्तरावरील योजनांपासून वंचीत राहत असतील त्या लोकांना याचा फायदा होईल त्यामुळे हे पद लवकरात लवकर भरावे अश्या मागणीचे निवेदन राधानगरी पंचायत समिती माजी सभापती व विद्यमान सदस्य दिलीप कांबळे यांनी महासंचालक डॉ . बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ) पुणे यांना दिले आहे.