धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी करा धनगर ऐक्य अभियान चे तहसीलदार यांना निवेदन

0
86

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

आज दि.13 आॅगस्ट रोजी धनगर समाज एसटी आरक्षणाची अंमलबजावणी तसेच समाजाच्या इतर मागण्यांचे रक्ताने लिहीलेले निवेदन १३ ऑगस्ट रोजी धनगर ऐक्य अभियानच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.धनगर समाज एसटी आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करा, धनगर समाजाच्या विकासासाठी घोषीत केलेल्या २२योजनांची अंमलबजावणी एक हजार कोटींची तरतूद ताबडतोब करा तसेच मेंढपाळांना आरक्षण देऊन त्यांच्यावर होणारे हल्ले थांबवा आदी मागण्यांचे रक्ताने लिहिलेले निवेदन सादर करण्यात आले. उपरोक्त मागण्यांचा गांभीर्याने विचार करून समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. सदर निवेदन धनगर ऐक्य अभियान चे समन्वयक सतीश हांडे यांच्या नेतृत्वात योगेश मोटे, पवन हंडाळ, शिवा पाचपोहे, संदीप पाचपोहे, गणेश होळकर ,क्रांती वाघ ,सुनील सुलताने यांच्या उपस्थित देण्यात आले.