केशोरी -गोंदिया बस सेवा सुरू झाल्याने प्रवाशांना मिळाला दिलासा आ.मनोहर चंद्रिकापुरे यांच्या मागणीला यश

128

 

बिंबिसार शहारे/राहुल उके

अर्जुनी मोरगांव दि.१३/०८/२०२०:
कोरोना काळात 3 महिने बंद असलेल्या गोंदिया ते केशोरी मार्गावरील नागरिकांना खुप त्रास होत असल्याने तेथील स्थानिक लोकांनी बस सुरू करण्याची मागणी केली होती.
अशा परिस्थितीत लोकांना येणे जाणे शक्य होत नव्हते केशोरीत राहणाऱ्या नागरिकांना गोंदिया -केशोरी बस सेवा देण्याची मागणी आमदार चंद्रिकापुरे यांनी केली होती.
पूर्वीच्या काळात केशोरी साठी साकोली डेपोची फक्त एक बस सेवा सुरू होती परंतु जिल्हा बंद असलेल्या पासून साकोली डेपो ने बस सेवा पूर्ण बंद केली होती ज्यामुळे नागरिकांना जाण्याची समस्या निर्माण झाली होती. इतर जिल्हा बस सेवा सुरू झाल्याने नागरिकांनी आमदार चंद्रिकापुरे यांच्या कडे बस सेवा सुरू करावी अशी मागणी केली होती त्यानंतर या क्षेत्रात मध्ये बस सेवा सुरू झाल्याने नागरिकांना येणे जाणे शक्य झाले आहे व तेथील स्थानिक लोकांना दिलासा मिळाला आहे.