शिक्षकाकडून तिन हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी पोलीस शिपाई निलंबित, पोलीस आयुक्तांची कारवाई

306

अमरावती(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
मद्यप्राशन केलेल्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून 3000 हजार रुपये लुबाडनाऱ्या पोलीस शिपायास निलंबित करण्यात आले आहे
अमित नाना धनकर ब न 1862 असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस शिपायाचे नाव असून दि 11 ऑगस्टला मालखेड मार्गावर संजय कोल्हे हे शिक्षक इतरांसह पार्टी करीत होते अमित धनकर व त्याचा सहकारी यांनी त्याच्या मित्राच्या मोबाइलमध्ये फोटो काढून संजय लोखंडेस तुम्ही दारु पिऊन आहात त्यामुळे तुमची वैद्यकीय तपासणी करावी लागते अशी धमकी देऊन लोखंडेला 3000 रुपये मागितले
याप्रकरणाची तक्रार चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला करण्यात आली होती या तक्रारीची पोलीस आयुक्त श्री संजय बाविस्कर यांनी दखल घेऊन पोलीस शिपाई अमित धनकर यास तडकाफडकी निलंबित केले