केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या पर्यावरण प्रभाव मुल्यांकन मसुद्याला यंग सिटीझन टीम चा विरोध फेसबुकवर व्हिडिओ: जनतेला मसुदा वाचून निर्णय घेण्याचे आवाहन

 

फुलचंद भगत
मंगरुळपीर: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरण प्रभाव मुल्यांकन (इआयए) २०२० चा जो मसुदा तयार केला आहे. त्यामुळे औद्योगिकीकरणाला पर्यावरण मंजुरीची गरज राहणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. ही बाब पर्यावरणासाठी आणि पर्यायाने सजीवसृष्टीसाठीच घातक असल्याचा युक्तीवाद मंगरुळपीर येथील ‘यंग सिटीझन टीम’ या उच्चशिक्षीत युवकांच्या संघटनेने केला असून, या मसुद्याचा निषेध मंगळवारी शहरात केला. शिवाय फेसबुकवर एक व्हिडिओ टाकून त्याद्वारे जनतेला पर्यावरण मंत्रालयाचा मसुदा वाचून तो समजून घेत पर्यावरण रक्षणासाठी शासनाला संदेश पाठविण्याचे आवाहनही केले आहे.
केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी औद्योगिकरणारला चालना देण्यासाठी पर्यावरण प्रभाव मुल्यांकन (इआयए) हा मसुदा तयार केला आहे. या मसुद्यात पर्यावरणविषयक नियामक निरीक्षणांची संख्या व कठोरता प्रचंड प्रमाणात कमी केली आहे. विविध कारखान्यांचे पुनर्वर्गीकरण केले आहे , जेणेकरून त्यांना पर्यावरणीय मंजुरीची गरज भासणार नाही. जनसुनावणीची व्याप्ती आणि त्यासाठी दिलेला कालावधी कमी करून त्यायोगे जनसुनावणी सोबत तडजोड केली आहे. निसर्गाचा अनादर करण्याचे सामान्यीकरण केले आहे. घटनोत्तर पर्यावरणीय मंजुºयांना नियमित करण्याची शिफारस आहे. त्याशिवाय नव्या उद्योगाच्या आक्षेपावरील सार्वजनिक सुनावणी प्रक्रियाही नष्ट केली आहे.या वेडी सूचित देशमुख म्हणाले की हे सर्व मुद्दे पर्यावरणासाठी घातक असून, पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ या मूळ कायद्याच्या उद्देशांचे उल्लंघन करणारा आहे. औद्योगिकरनाला आमचा विरोध नाही पण औद्योगिकरन पर्यावरण संरक्षणाच्या कचाट्या मधेच झाल तर खरा विकास होईल असे मत व्यक्त केले. मंगरुळपीर येथील यंग सिटीझन टीमचे संस्थापक अध्यक्ष सूचित देशमुख, वैष्णव इंगोले, करण मुंढरे, अनुप इंगळे, आकाश चौधरी यांनी शहरातील विविध चौकांत फलक दर्शवून या मसुद्याचा निषेध केला आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8450273206
9763007835