चंद्रपूर जिल्ह्यासह चिमूर तालुक्यात दारु व सट्याची गावोगावी धुंम!

 

प्रदीप रामटेके
मुख्य संपादक

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी उठली व दारुंची दुकाने जिल्हाभर सुरू झाली.यामुळे तळीरामांना दारु पिण्याचे मार्ग बऱ्याच अंशी सुलभ झाली.मात्र दारु बंदी काळातील दारु विकण्याची सर्व प्रकारची जूनी कार्यपद्धत जैसे थे कायम राहिली.आजही चंद्रपूर जिल्हातंर्गत गावोगावी,शहरातील गल्लीबोळ्यात अवैध दारु विक्रीची दुकाने थाटात सुरू असल्याचे चित्र सर्वत्र आहे.तद्वतच सट्टामटका चंद्रपूर जिल्ह्यात एवढा चालतो की,दररोज करोडो रुपयांची उलाढाल होत असल्याचे बोलले जात आहे.

दारु जिथे मिळेल तिथे पिण्याची सवय तळीरामांना जळल्याने,तळीरामांचे पाय शासनमान्य देशी दारू दुकानाकडे वळण्यापेक्षा गावातील व मोहल्ल्यातील दारु विक्री दुकानाकडेच वळलेली असल्याचे सर्वदूर चित्र आहे.याचबरोबर सट्टामटका या व्यवसायाने गावोगावी आपले जाळे पसरवले असून हा व्यवसाय तेजीत सुरू आहे.

देशी,गावठी दारू सह सट्टामटका या अवैध व्यवसायांने शहरी भागा बरोबर ग्रामीण भागात मजबूत केलेली जाळे आश्चर्यजन व तितकेच लाजीरवाणे आहे.एकंदरीत दारुचा व सट्टा मटक्याचा अवैध व्यवसाय चंद्रपूर जिल्ह्यासह चिमूर तालुक्यात बिनधास्तपणे सुरू असणे याला काय म्हणायचे?व सामाजिक सुरक्षेला काय उपमा द्यायची?हेच गुलदस्त्यातील महागंभीर अर्थकारणाचे कोडे आहे.