स्वातंत्र्यसेनानी यांचे हुतात्मा स्मारकाची रंगरंगोटी व सुशोभीकरण करण्यात यावे। डॉ. नामदेव उसेंडी माजी आमदार

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक
दखल न्यूज भारत

गडचिरोली :- 9 ऑगस्ट 1942 आणि इंग्रजांविरुद्ध चलेजाव आंदोलनाचे आव्हान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिलेल्या आंदोलनात करो या मरो हा नारा देऊन तत्कालीन स्वातंत्र्यसेनानी इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्यासाठी लढा उभारला या आंदोलनात गडचिरोली, आरमोरी, वडसा,चामोर्शी येथील स्वातंत्र्यसेनानिनी सुद्धा भाग घेतला होता. या स्वातंत्र्यसेनानीना इंग्रज पोलिसांनी पकडून त्यांचे अतोनात हाल केले. या आंदोलनामुळेच 15 ऑगस्ट 1947 ला देशात स्वातंत्र्य झाले. या स्वातंत्र्य सैनिकाची आठवण व प्रेरणा पुढील पिढ्यांना मिळण्यासाठी म्हणून महाराष्ट्र सरकारने सन 1972-73 मध्ये प्रत्येक आंदोलन स्थळी हुतात्मा स्मारक बांधण्यात आले. दरवर्षी नागरिक नऊ ऑगस्ट क्रांती दिन 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय सणाच्या दिवशी हुतात्मा स्मारकासमोर श्रद्धांजली व अभिवादन करतात
परंतु मागील काही वर्षापासून या हुतात्मा स्मारकाकडे
जिल्हा प्रशासन व नगर प्रशासन यांच्याकडून दुर्लक्ष झाल्यामुळे हे हुतात्मा स्मारक अडगळीत पडून असून त्यांची दुरावस्था झालेली आहे. हुतात्मा स्मारकाची रंगरंगोटी व सुशोभीकरण याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने अत्यंत वाईट अवस्थेमध्ये हुतात्मा स्मारक उभे आहेत. हा स्वातंत्र्यसेनानी यांचा अपमान आहे. येणाऱ्या 15 ऑगस्टपूर्वी जिल्हा प्रशासन किंवा स्थानिक नगर परिषद, नगरपंचायत प्रशासनाकडून हुतात्मा स्मारकाचे रंगरंगोटी व सुशोभीकरण करण्याचे आदेश आपल्या स्तरावरून प्रशासनाला देण्यात यावे. अशा आशयाचे पत्र डॉ. नामदेवराव उसेंडी माजी आमदार तथा अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली यांचे शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी गडचिरोली यांना देण्यात आले. यावर निवासी उपजिल्हाधिकारी गडचिरोली यांनी 15 ऑगस्ट पूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व हुतात्मा स्मारकाची रंगरंगोटी करण्यात येईल असे सांगण्यात आले तसेच 26 जानेवारी 2021 पूर्वी तालुक्याच्या ठिकाणी स्वातंत्र्यसेनानी यांचे नावाचे फलक लावण्याच्या सूचना संबंधित तहसीलदार यांना देण्यात आले.
यावेळी प्रभाकर वासेकर कोषाध्यक्ष, सतीश विधाते शहराध्यक्ष, पांडुरंगी धोटेकर ओबीसी सेल, तेजस मडावी उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी हे उपस्थित होते.