नविन कोराडी मध्ये पुन्हा एक धान्य भांडारवाला आढळला कोरोना पाँजिटीव

0
969

 

सुनील उत्तमराव साळवे(9637661378)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

कोराडी / नागपुर : 13 आँगस्ट 2020
नागपुर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात असलेल्या महादुला कोराडी येथील एक धान्य भांडार संचालक वय 50 वर्षे यांचा कोरोना पाँजिटीव काल आला.
कंभाले कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या धान्य भांडार वाले 50 वर्षिय व्यक्ती यांचे दुकान व्यतिरिक्त महादुला बाजार चौकात ही उठणे बसणे होते असेही म्हणतात. नवीन कोराडी वार्ड क्रमांक 2 मध्ये राहणाऱ्या या व्यक्तीचा रिपोर्ट पाँजिटीव आल्याने त्याला मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याला निमोनिया व अस्थमा चा पण त्रास असल्याचे बोलले जाते.
कोराडी ग्रा पं. सचिव उत्तम झेलगोंदे व त्यांच्या ग्रा पं कर्मचारी यांनी या व्यक्तीच्या घरी सेनिटायजर फवारणी करुन त्याचे घर सील केले आहे. या व्यक्ती च्या कुटुंबातील 8 सदस्य हे हाय रिस्क कैंडिडेट असुन त्यांची आज महादुला नगरपंचायत येथे कोव्हीड 19 टेस्ट केली जाईल अशी माहिती कोराडी ग्रा पं सचीव उत्तम झेलगोंदे यांनी दखल न्यूज भारत चैनल ला सांगितली.