Home चंद्रपूर  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने वृक्षारोपण करून केला अध्यक्षांचा वाढदिवस साजरा

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने वृक्षारोपण करून केला अध्यक्षांचा वाढदिवस साजरा

174

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे घुग्घुस शाखा अध्यक्ष सुरेश खडसे यांच्या वाढदिवस पोलीस स्टेशन येथे वॄक्षारोपन व खाजगी रुग्णालयात फळे वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला .तसेच शिवा रेस्टोरेंट येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने तर भारतीय जनता पार्टी च्या नेत्यांनी घरी येऊन सम्पूर्ण सोशल डिस्टनसिंग चे पालन करत शुभेच्छा दिल्या व केक कापला .
गावात अश्या प्रसंगी विविध उपक्रम राबविल्या जातात मात्र वृक्षारोपण करण्यात येत नाही. वृक्षारोपण काळाची गरज आहे हेच लक्षात ठेवत पोलीस स्टेशन येथे वॄक्षारोपन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा घुग्घुस चे अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार सुरेश खडसे, सचिव प्रशांत चरडे, संजय जीवनकर, प्रणयकुमार बंडी, नौशाद शेख , संजय पडवेकर ,प्रभाकर कुम्मरी, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक कंत्राटी कामगार सेनेचे उपाध्यक्ष किशोर बोबडे, भाजपा नेते ऋषी कोवे, पंकज रामटेके, युवा सेना तालुका प्रमुख हेमराज बावणे, किशोर साधनकर ,गोलु कांबळे, पो.ह. मंगेश निरंजने, व किशोर डंभारे उपस्थित होते.

Previous articleप्रशासनाने रेती घाट सुरु करावे अन्यथा तीव्र आंदोलन- सुरेंद्रसिंह चंदेल यांचा प्रशासनाला इशारा
Next articleनविन कोराडी मध्ये पुन्हा एक धान्य भांडारवाला आढळला कोरोना पाँजिटीव