प्रशासनाने रेती घाट सुरु करावे अन्यथा तीव्र आंदोलन- सुरेंद्रसिंह चंदेल यांचा प्रशासनाला इशारा

134

 

राकेश चव्हाण तालुका प्रतिनिधी

कुरखेडा :-
संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात व तालुक्यात मागील आर्थिक वर्षात रेती घाटावरून रेती वाहतुकीची परवानगी थांबविण्यात आलेली आहे त्यामुळे शासकीय व इतर बांधकामाची कामे थांबलेली आहेत: बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे: स्थानिक ग्रामपंचायतीची विकास कामे खोळंबलेली आहेत, ग्रामपंचायत स्तरावरील घरकुल ची कामे रखडलेली आहेत पूर्ण कालावधीत बांधकाम न झाल्यास निधी परत जाण्याची शक्यता असते या कारणास्तव जर एखाद्या घरकुल धारकाने रेती घाटावरून विनापरवानगी रेती आणल्यास त्यावर दंडात्मक कार्यवाही केली जात आहे त्यामुळे त्यांना आर्थिक फटका बसत आहे •नगरपंचायत स्तरावरील भरपूर विकास कामे रेती अभावी रखडलेली आहेत• विकासकामांचा निधी परत जाण्याची भीती संबंधित कंत्राटदारांना निर्माण झालेली आहे •शासनाने त्वरित रेती घाट सुरू करून आवश्यक परवानगी सह वाहतूक करण्याची परवानगी द्यावी,उपलब्ध करुण द्यावी अन्यथा प्रशासनाविरोधात प्रत्येक तालुकास्तरावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य तथा परिवर्तन संघटनेचे सुरेंद्रसिंह चंदेल यांनी प्रशासनाला पत्रकाद्वारे दिला आहे