प्रतिनिधी/रमेश बामनकर
गुड्डीगुडम: सिरोंचा नगर पंचायत ला विद्यमान आमदार मा.धर्मरावबाबा आत्राम यांच्या पुढाकाराने सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून (जिल्हास्थर) ४३ लाख रुपयांची निधी प्राप्त झाली आहे.
कोरोनाच्या संकट काळातही आमदार मा.आत्राम यांनी जिल्ह्याची आणि मतदारसंघाचा विकासाकरिता निधी उपलब्ध करुन घेत आहेत.
नगरपंचायत सिरोंचा कार्यालयाला प्रभागातून पाण्याची समस्या दूर करण्यास मागणी केले होते, त्या मागणीची न.प.ने दखल घेऊन प्रत्येक प्रभागात १ ते २ बोरव्हेल खोदण्यास प्रारंभ केला आहे.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक रवी रालाबंडीवार व नगरसेवक नरेश अलोने ,नागरसेवक विजय तोकला, तालुकाध्यक्ष श्री.मधुकर कोल्लूरी, पंचायत समितीचे उपसभापती श्री.कृष्णमूर्ती रिक्कुला,तालुकासचिव श्री एम.डी.शानु आणि गावकरी उपस्थित होते.