नगर सेवा समितीद्वारा आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांना स्कुल बँगची भेट

 

वणी : परशुराम पोटे

येथील नगर सेवा समिती ही दरवर्षाला अनेक सामाजिक उपक्रम राबवित असते, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बंद ठेवण्यात आलेल्या शाळा,महाविद्यालये आता सुरु होणार आहेत. परिणामी नगर सेवा समितीद्वारा आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामाकरिता स्कुल बँगची भेट देण्यात आली आहे.
झरी तालुक्यातील जि.प.उ.प्राथ.शाळा,सुर्ला शाळेतील १०२ विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक कार्यासाठी नगर सेवा समितीचे संस्थापक श्री दिलीप कोरपेनवार, श्री.सुभाष आडे सर यांच्या उपस्थितीत स्कूल बॅग देण्यात आले. सदर साहित्य शाळेतील मुख्याध्यापक तथा समितीचे पदाधिकारी श्री. रमेश बोबडे सर यांनी स्विकारले आहे.