सुकाळा गावात व परिसरात जनावराचे आरोग्य शिबिर लावा श्री. भारत भैसारे उपसरपंच यांची मागणी

183

 

हर्ष साखरे ता प्रतिनिधी आरमोरी

आरमोरी तालुक्यातील मौजा सुकाळा व परिसरातील मेंढेबोळी, मोहझरी, शिवणी खुर्द या गावातील जनावरांच्या शरीरावर मोठे मोठे चट्टे पडल्याने जनावरांना ताप येत आहे .त्यामुळे जनावरांचे चारापाणी खाणे बंद झाले आहे .शेतीच्या हंगामात जनावर अज्ञात रोगाने ग्रासले असल्याचे शेतकरी चिंताग्रस्त झालेले दिसून येतात. शेतकरी वर्गामध्ये मोठे संकट उभे निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुकाळा व परिसरात जनावर शिबिर घेऊन शेतकर्‍यांना चिंता मुक्त करावे अशी मागणी सुकाळा येथील भारत भैसारे उपसरपंच यांनी मागणी केली आहे.