Home गडचिरोली सार्वजनिक वाहतूक सेवा एसटी पूर्ववत सुरळीत सुरू करण्यात यावी व जिल्हा बंदी...

सार्वजनिक वाहतूक सेवा एसटी पूर्ववत सुरळीत सुरू करण्यात यावी व जिल्हा बंदी हटविण्यात यावी -वंचित बहुजन आघाडी ची मागणी

154

कुरखेडा /राकेश चव्हाण प्र

22 मार्च कोरोणा महामारी चा संसर्ग पसरू नये याकरिता संपूर्ण देशात व राज्यात विविध प्रकारच्या योजना ,प्रतिबंध करण्यात आले, त्यामध्ये मुख्यत सार्वजनिक वाहतूक सेवा बंद करण्यात आली तसेच खाजगी ऑफिस ,कंपन्या ,दुकाने ,टपऱ्या बंद ठेवण्याची निर्देश शासनाने दिले •चार ते पाच महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही ती सुरू करण्यात त्यात आलेली नाहीत •त्यामुळे 100% आर्थिक संकट उभे ठाकले आहे जनसामान्य जनता आर्थिक अडचणीत आलेली आहे• 80 टक्के लोकांवर उपासमारीची व बेरोजगारीची वेळ आलेली आहे याशिवाय सार्वजनिक वाहतूक सेवा एसटी द्वारे बंद असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला प्रवास करण्याकरिता त्रास सोसावा लागत आहे •गडचिरोली जिल्ह्यातील प्रशासनाने जिल्हाबंदी लागू केल्यामुळे जनतेला आवश्यक वैद्यकीय सेवा शैक्षणिक सेवा व इतर कामासाठी जाण्यास निर्बंध लादले यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मानसिक व आर्थिक त्रास सोसावा लागतो यादृष्टीने प्रशासनाने तात्काळ सार्वजनिक वाहतूक एसटी सेवा सुरू करण्यात यावी व जिल्हा बंदी हटविण्यात यावी या मागणी करिता माननीय बाळासाहेब आंबेडकर यांचे आव्हान नुसार स्थानिक तहसिलदार यांचे मार्फतीने प्रशासनाला कळविण्याची निवेदन सादर करण्यात आले याप्रसंगी योगीराज टेंभुर्णी, डॉक्टर फुलचंद रामटेके, सामाजिक कार्यकर्ते तलत अली सय्यद, शक्ती गजभिये खुशाल रामटेके व इतर पदाधिकारी उपस्थित होते

Previous articleचंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 944 कोरोनामुळे जिल्ह्यातील सहावा मृत्. 24 तासात 46 बाधितांची नोंद
Next articleसुकाळा गावात व परिसरात जनावराचे आरोग्य शिबिर लावा श्री. भारत भैसारे उपसरपंच यांची मागणी