क्वारंटाईन केंद्रातुन एक पुरूष गायब. मुलाची आमगांव तहसीलदारा कडे तक्रार..

238

सचिन श्यामकुंवर तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत..।।
आमगांव येथुन क्वारंटाईन केंद्रात रेफर केलेला एक वुध्द पुरुष गोदियाच्या तंत्रनिकेतन विद्यालयातुन गायब झाल्याची तक्रार त्याच्या मुलाने आमगांव तहसीलदारा कडे केली आहे.आमगांव तालुक्यातील अंजोरा येथील एका वुध्दाला ७आँगस्ट रोजी सर्दी.खोकला असल्याने त्याला आमगांव च्या ग्रामीण रूग्णालयात त्यांच्या मुलाने नेले होते.पंरतु डाक्टरांनी त्याला गोदिया ला जाण्याचा सल्ला दिला..कोविड १९ची लक्षणे दिसत असल्यामुळे त्याला रुग्णवाहिकेने गोदियाला पाठवून तंत्रनिकेतन विद्यालय गोदिया येथे क्वारंटाईन करण्यात आले होते.पन तेथे तो वुध्द नसल्याचा फोन त्याच्या मुलाला आला..माझ वडील क्वारंटाईन कक्षातुन गायब झाल्याची तक्रार त्याने तहसीलदार भोयर यांच्या कडे केली आहे..