झिंगाबाई टाकळी च्या साहिल सैय्यद याचा ३ मजली अनाधिकृत बंगला नागपुर मनपाने पाडला

388

 

सुनील उत्तमराव साळवे
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

झिंगाबाई टाकळी / नागपुर :-१३ आँगस्ट २०२०
काल झिंगाबाई टाकळी येथील बाबा फरीद नगर मधील बगदादिया काँलनी तील साहिल सैय्यद यांच्या सर्वे नं ८८ , प्लाँट नं २४४, २४५ वर अवैधरीत्या कब्जा करुन अनाधिकृत बांधकाम केलेला ३ मजली बंगला काल नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार मंगळवारी झोन च्या अतिक्रमण तोडु दस्ताने बुलडोजर लाऊन तोडला.
मनपा उपायुक्त महेश मोरानी यांचे नेत्रृत्वाखाली मनपाचे सहायक सिविल इंजिनियर दिपक जांभुळकर, गिरी, जांभुळकर, सोनकुसरे तसेच अतिक्रमण विरोधी विभागाचे माळवे, बावने, डहाके यांनी मानकापुर पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण तोडले. प्राप्त माहितीनुसार या ले आऊट मधील सर्वच बांधकामे हे अनाधिकृत असुन त्यांना सुद्धा मनपा नागपुर यांनी नोटिसा बजावल्या असुन त्यांचे देखील अतिक्रमण काढणार अशी मनपा सुत्रांनी सांगितले.