प्रधानमंत्री किसान सन्मान योजना लाभार्थ्यांना बँकेतील रक्कम गावातील पोस्ट ऑफिस मध्ये निशुल्क मिळणार.- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

223

प्रतिनिधी राजेंद्र न्हावी
जळगाव – प्रधानमंत्री किसान सन्मान योजना यांचा सहावा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे. तसेच बँकांमध्ये होत असलेली गर्दी लक्षात घेता डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँक तर्फे सर्व लाभार्थ्यांना ही रक्कम आपल्या गावातील पोस्ट ऑफिस मध्ये कोणतेही शुल्क न आकारता मिळणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक मार्फत घेण्यात येणाऱ्या aeps या सुविधेद्वारे लाभार्थी स्वतःच्या कोणतेही बँक खात्यातील रक्कम पोस्ट ऑफिस मधून घेऊ शकतात, त्यासाठी आपल्या बँक खात्याला आधार लिंक असणे गरजेचे आहे. यासाठी आपल्या आधार कार्ड च्या साह्याने व बोटाच्या स्पर्शाने पैसे काढता येतात. यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये आपले खाते असणे आवश्यक नाही व एका वेळी जास्तीत जास्त 10 हजार पर्यंत आपण पैसे काढू शकतात. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे