Home महाराष्ट्र कसर्ला (पेंढरी) ता. नागभिड येथील पिडीत वाघमारे कुटुंबियांचे सांत्वन करूण वंचित बहुजन...

कसर्ला (पेंढरी) ता. नागभिड येथील पिडीत वाघमारे कुटुंबियांचे सांत्वन करूण वंचित बहुजन आघाडीचे वतीने केली आर्थीक मदत.

195

(चंद्रपूर जिल्हा)
भगवंत पोपटे,
नागपूर विभागीय प्रतिनिधी,
दखल न्युज व दखल न्युज भारत.

कसर्ला (पेढरी) तालुका नागभिड येथील वाघमारे कुटुंबातील १६ वर्षीय तरुणी आईचे सांगण्यावरून आपले शेतावर गेली असता, त्याच गावातील दोन तरूण नामे १) अजय नन्नावरे वय २२ वर्षे २) मंगेश मगरे वय २७ वर्षे या वासनांध समाजकंटक नराधमांनी तरूणीवर पाशवी बलात्कार करून, तिला आत्महत्तेस प्रवृत्त केल्याने तिने शेतशिवारातील विहीरीत उडी घेऊन आत्महत्त्या करीत आरोपींची नावे ‌सुसाईट नोटमध्ये लिहून ठेवले होते. त्यामुळे नागभिड पोलीसांना त्यांना अटक करून गजाआड करण्यात हयगय करता आली नाही. दोन्ही आरोपींविरुद्ध अप. क्र.- २२७/२०२० नुसार कलम ३६३,३७६,३०५ दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
‌ त्यांचेवर कठोरातली कठोर कारवाई करावी यासाठी दिनांक- ११/८/२०२० ला वंचित बहुजन आघाडीचे वतीने जेष्ठ नेते मा. रमेशकुमार गजभे, अरविंद सांदेकर यांचे प्रमुख उपस्थितीत कसर्ला गावात जाऊन पिडीत कुटुंबातील सदस्यांना भेट देऊन वंचित बहुजन आघाडीतर्फे कडक कारवाईची मागणी रेटून धरू असे पिडीत कुटुंबाला आश्र्वासन देत पिडीत कुटुंबातील सदस्यांची सांत्वना केली. व पिडीत कुटुंबाला १०,०००/- रुपये ची आर्थीक मदत करण्यात आली. तिथुन नागभिड पोलिस स्टेशनला भेट देऊन पोलिस निरीक्षक दिपक गोतमारे याची भेट घेऊन, दोन्ही आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी यासाठी वंचित बहुजन आघाडीचे वतीने ठाणेदारांना चर्चेत विचारपूस केली. आणि ही केस फास्टट्रॅक कोर्टात केस दाखल करण्यात यावी. आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी केली.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे नेते मा . डॉ. रमेशकुमार गजभे, अरविंद बांदेकर, तालुका अध्यक्ष- अश्विन मेश्राम, तालुका महिला अध्यक्षा- सौ. कल्पना खरात, किशोर घरत, राजेंद्र मेश्राम, राकेश बावनगडे, राजकुमार मेश्राम, खेमदेव गेडाम, युवराज बोदेले, अंबादास धोंगडे, मानिक दोहितरे, घनश्याम गजभिये, केशव माटे, धर्माजी गराडकार आदि मान्यवर व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleसाकोलीत स्वातंत्र दिनानिमित्त हिंद सेना करणार रक्तदान शिबिराचे आयोजन राष्ट्रसेवा-जनसेवा हाच आमचा धर्म- राष्ट्रीय प्रतिनिधी भाष्कर येवले
Next articleकोरोनामुळे मृत दोन्ही पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी :-सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी..