साकोलीत स्वातंत्र दिनानिमित्त हिंद सेना करणार रक्तदान शिबिराचे आयोजन राष्ट्रसेवा-जनसेवा हाच आमचा धर्म- राष्ट्रीय प्रतिनिधी भाष्कर येवले

123

 

साकोली तालुका प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

साकोली-अखिल भारतीय समाजसेवि संघटना हिंद सेनेच्या वतीने स्वातंत्र दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंद सेनेचे राष्ट्रीय प्रतिनिधी भाष्कर येवले यांनी दखल न्युज भारतशी बोलताना सांगितले की,आमची ही संघटना राष्ट्रीय अध्यक्ष श्री.मंगेश वैद्य साहु यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी अनेक उपक्रम राबवित असते जसे, वृक्षारोपण,गरीब असहाय्य लोकांना कपडे,फळे, पुस्तके वाटप रक्तदान शिबीर, महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी इत्यादी कार्यक्रम राबविले जातात.
15 ऑगस्ट स्वातंत्र दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावर देशात ठिकठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करणार आहे.भाष्कर येवले यांनी सांगितले की,आमची संघटना ही शुद्ध रुपाने गैर राजकीय व समाजसेवी आहे.राष्ट्रीय अध्यक्ष श्री.मंगेश वैद्य साहु यांनी संघटने मध्ये समाजातील सर्व वर्गांतील लोकांना जोडले आहे.हिंद सेनेत नामी वकिल, डॉक्टर, इंजिनिअर, उद्योगपती, व्यापारी, शेतकरी, दलित, समाजसेवी महिला व सर्व प्रकारच्या विचारधारेचे लोक जोडले गेले आहेत.
राष्ट्रीय अध्यक्ष हे निसर्ग प्रेमी युवा आहेत.यामुळे त्यांनी देशातील छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, पंजाब,उडीसा अन्य राज्यातुन तिन लाखांहून अधिक झाडांची लागवड केली.
राष्ट्रीय अध्यक्ष श्री.मंगेश वैद्य साहु यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय स्तरावर देशात ठिकठिकाणी रक्तदान शिबिर व प्लाज्मा डोनेट शिबिराचे आयोजन 15 ऑगस्ट 2020 रोजी केला जाणार आहे.यावेळी भंडारा जिल्हा अध्यक्ष आशिष राऊत हे उपस्थित होते.